वणीत कोबी, फ्लॉवर कवडीमोल भावाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:09 IST2020-03-04T22:07:32+5:302020-03-04T22:09:16+5:30

वणी/पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी आठवडे बाजारात कोबी, फ्लॉवरला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून. फ्लॉवर, कोबीचा गड्डा दोन रुपयाने विक्री झाला.

Waffle cabbage, cauliflower for sale | वणीत कोबी, फ्लॉवर कवडीमोल भावाने विक्री

वणीत कोबी, फ्लॉवर कवडीमोल भावाने विक्री

ठळक मुद्देनाराजी : दोन रु पयात दोन किलोचा गड्डा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी/पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी आठवडे बाजारात कोबी, फ्लॉवरला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून. फ्लॉवर, कोबीचा गड्डा दोन रुपयाने विक्री झाला.
दिंडोरी तालुक्यातील वणी येथील आठवडे बाजारात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, निफाड, चांदवड व मालेगाव तालुक्यातील अनेक व्यापारी व शेतकरी बांधव आपला शेतमाल हात विक्र ीसाठी वणी येथील बाजारात आणतात.
चांदवड तालुक्यातील समाधान रकिबे या शेतकऱ्याने फ्लॉवरचे गड्डे (कंद) वणी बाजारात विक्र ीसाठी आणले असता दोन रु पयापासून
ते एखादा कंदच दहा रु पयेप्रमाणे विक्र ी केला. लागवड खर्चसुद्धा निघणार नसल्याचे अशोक गोतरणे व समाधान रकिबे यांनी सांगितले. यावर्षी पावसाळ्यात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता. त्यात शेतकरी कुठेतरी सावरतील म्हणून त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. परंतु बाजारात फ्लॉवर व कोबीची आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत.

Web Title: Waffle cabbage, cauliflower for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.