वडाळीभोईत श्वानाने अकरा जणांना घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST2021-07-14T04:18:36+5:302021-07-14T04:18:36+5:30

श्वानाने केलेल्या हल्ल्यात सुभाष दिनकर आहेर (४८ ), मनोज भाट (१०) रा. धोंडबे, अश्विनी गंगाधर आहेर (२३), ...

In Wadali Bhoi, the dog bit eleven people | वडाळीभोईत श्वानाने अकरा जणांना घेतला चावा

वडाळीभोईत श्वानाने अकरा जणांना घेतला चावा

श्वानाने केलेल्या हल्ल्यात सुभाष दिनकर आहेर (४८ ), मनोज भाट (१०) रा. धोंडबे, अश्विनी गंगाधर आहेर (२३), प्रकाश निवृत्ती केदारे (४५) रा. भुत्याणो, धवण अण्णा पवार(१५), सोमनाथ बाळासाहेब पवार (३९), जयेश संजय जाधव (१७), कार्तिक सागर आहेर (४) , ओमी बिपीन पटलतील (४), गीता हरिदास पटलतील (४७), चंद्रभागा रघुनाथ आहेर (४८) रा. वडाळीभोई आदी दहा जणांना श्वानाने चावा घेतला. त्यांच्यावर वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.श्रीमती पालवी यांनी औषधपचार केले व त्यांना रेबीजची लस देण्यात आली. दरम्यान, वडाळीभोई गावात अनेक मोकाट श्वान नगरपालिका क्षेत्रातून बंद जाळीच्या गाडीतून आणून सोडत असल्याचे प्रकार वडाळीभोई परिसरातील नागरिकांनी बघितल्याची घटना शिवसेना जिल्हा उपप्रमुख नितीन आहेर यांनी सांगितली व या मोकाट श्वानांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: In Wadali Bhoi, the dog bit eleven people