शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

वडाळा जॉगिंग ट्रॅकलगत वाहतेय गटार; फेरफटका मारताना दुर्गंधीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:55 IST

नाशिक : वडाळागाव चौफूली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १कि.मीचा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजर गवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडूंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. ...

ठळक मुद्दे महापालिकेने जबाबदारी पुर्ण केल्याचा आव आणला आणि हात झटकले.या जॉगिंगट्रॅकवरुन फेरफटका मारणे म्हणजे निरोगी शरीर रोगी करुन घेण्यासारखे

नाशिक : वडाळागाव चौफूली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १कि.मीचा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजर गवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडूंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. जॉगिंग ट्रॅक संकल्पना खरी तर निरामय सुदृढ आरोग्यासाठी विकसीत करण्यात आली आहे. शहरातील जॉगिंग ट्रॅक या संकल्पनेनुसार विकसीत करण्यात आले देखील आहे; मात्र वडाळागावाचा जॉगिंग ट्रॅक याबाबत अपवाद ठरतो. या जॉगिंगट्रॅकवरुन फेरफटका मारणे म्हणजे निरोगी शरीर रोगी करुन घेण्यासारखे असेच आहे. कारण जॉगिंग ट्रॅकला आलेला बकालपणा, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी पडलेला कचरा, वाहणारी गटारगंगा, खड्डे, बाकांचा अभाव, पथदीपांची असुविधा, व्यायाम साहित्याची कमतरता, संरक्षक कुंपणाची तटबंदी नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी या जॉगिंगट्रॅकला ग्रासले आहे. केवळ एक ते दीड किलोमीटरचा हा ट्रॅक विकसीत करण्याबाबत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीदेखील तितकेच उदासिन आहे. या जॉगिंगट्रॅकचा वापर भाजी बाजार, वाहनतळासाठीदेखील केला जाऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वडाळागाव हे इंदिरानगर-डीजीपीनगर क्रमांक १ च्या मध्यभागी असून या गावापासून उजव्या क ालव्यावर दोन्ही बाजूंनी जॉगिंग ट्रॅक आहेत; मात्र इंदिरानगर व डीजीपीनगर विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे सुसज्ज अद्ययावत ट्रॅक पहावयास मिळतात. वडाळागावाच्या नागरिकांना मात्र ट्रॅकच्या सुविधेपासून वर्षानुवर्षांपासून वंचित रहावे लागत आहे. वडाळागावातील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांकडून वडाळा चौफूली ते साईनाथनगरपर्यंतच्या ट्रॅकला अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र या ट्रॅकची दुर्दशा बघून नागरिकांना नाईलाजास्तव पाठ फिरवावी लागत आहे. कालव्याच्या जागेत वृक्षराजी चांगली बहरली असून गरज आहे, ती जॉगिंगट्रॅकच्या विकासाची. चार वर्षांपुर्वी मुरूम टाकून वृक्षराजीच्या मध्यभागातून केवळ रस्ता तयार करून महापालिकेने जबाबदारी पुर्ण केल्याचा आव आणला आणि हात झटकले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य