विल्होळीला ‘व्हीव्ही पॅट’चे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:31 IST2018-12-26T00:30:52+5:302018-12-26T00:31:25+5:30
निवडणूक आयोग, तहसील कार्यालयाच्या वतीने विल्होळी येथे ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले.

विल्होळीला ‘व्हीव्ही पॅट’चे प्रात्यक्षिक
विल्होळी : निवडणूक आयोग, तहसील कार्यालयाच्या वतीने विल्होळी येथे ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले. मारुती मंदिर परिसरात गावातील सर्व नागरिकांना यावेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट यंत्राची माहिती तसेच त्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी सरपंच बाजीराव गायकवाड, मंडळ अधिकारी जे. व्ही. लिलके, तलाठी दत्तात्रेय चोळके, ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, मोतीराम भावनाथ, पोलीस पाटील संजय चव्हाण, सावळीराम डांगे, कारभारी गायकवाड, भानुदास लष्करे, सुदाम थोरात, निवृत्ती डांगे, रामदास घेळ, बहिरू थोरात, रामजी पाटील थोरात, तोडकर गुरुजी, समाधान भावनाथ, सुभाष थोरात, लक्ष्मण भावनाथ, झुंबर बेंडकोळी आदी उपस्थित होते.