वाघ गुरुजी शाळेत मतदान जागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:46 IST2019-03-23T23:45:57+5:302019-03-23T23:46:14+5:30
म.वि.प्र. समाज संचलित वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर या शाळेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता रॅली काढण्यात आली.

वाघ गुरुजी शाळेत मतदान जागृती रॅली
नाशिक : म.वि.प्र. समाज संचलित वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर या शाळेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता रॅली काढण्यात आली. प्रत्येकाने मतदानाचा हक्क व कर्तव्ये पूर्ण करावे याकरिता, प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान, जय मतदान, आपला हक्क मतदानाचा हक्क, अशा घोषवाक्यांतून मतदान करण्याची जनजागृती केली. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. तसेच शाळेत निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.