पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
By Admin | Updated: June 29, 2014 00:37 IST2014-06-28T22:52:39+5:302014-06-29T00:37:05+5:30
पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
नाशिक : महापालिकेच्या सातपूर व नाशिकरोड येथील दोन प्रभागातील रिक्त जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी दिवसभर वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदारराजाला आळवणी केली.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे सातपूरच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये दिनकर पाटील यांना, तर हेमंत गोडसे यांना नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक ६१ मधून राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. प्रभाग १७ मध्ये दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली, तर सदाशिव माळी हे कॉँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत. नाशिकरोडच्या प्रभाग ६१ मध्ये शिवसेनेने केशव पोरजे यांना, तर आघाडीने रवींद्र पोरजे यांना उमेदवारी दिली आहे. पोपटराव हगवणे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागात रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान घेण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी सर्व तयारी करण्यात आली. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक व साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी दोन्ही प्रभागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मतदानाला काही कालावधी बाकी असल्याचे पाहून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला. (प्रतिनिधी)