सर्वतीर्थ टाकेद येथे मतदान कार्ड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:55 IST2019-03-18T00:55:12+5:302019-03-18T00:55:50+5:30
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे नवीन मतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता टाकेद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम झाला.

टाकेद येथे मतदान कार्ड दाखविताना नवमतदार.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे नवीन मतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता टाकेद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम झाला.
गावातील महिला, ग्रामस्थ नवीन मतदार तरु णांनी मतदान कार्ड मिळविण्यासाठी गर्दी केली होती. मतदान कार्ड वाटप करतेवेळी नवमतदारांचे स्वागत करण्यात आले. टाकेद ग्रामपंचायतीचे लिपिक सतीश् जाधव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेद बुद्रुक येथील शिक्षक एकनाथ खाडे यांनी यावेळी नवीन मतदारांना मतदान कार्डसंदर्भात मार्गदर्शन केले व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती दिली.