२० जानेवारीला मतदान : बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: December 27, 2014 00:46 IST2014-12-27T00:46:24+5:302014-12-27T00:46:54+5:30
येवला औद्योगिक वसाहतीची निवडणूक

२० जानेवारीला मतदान : बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न
येवला : येवला औद्योगिक सहकारी वसाहतीची बहुचर्चित पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सभासदांची बैठक आमदार छगन भुजबळ यांनी बोलावून संचालक मंडळाची सहमतीने बिनविरोध निवड व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
औद्योगिक सहकारी वसाहतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला असून, २० जानेवारी २०१५ रोजी मतदान व मतमोजणी केली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीचे संस्थापक रमेशचंद्र पटेल यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेल्या वसाहतीत २००८ साली झालेल्या निवडणुकीनंतर तत्कालीन संचालक मंडळावर विविध आरोप लागून संचालक मंडळ बरखास्त झाले होते. यांनतर विक्रम गायकवाड, श्याम कंदलकर, सुकृत पाटील यांची प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती.
२ एप्रिल २०११ पासून संचालक मंडळाने कारभार हाती घेतला व तब्बल तीन वर्षे व आठ महिने प्रशासकीय कारकीर्द चालली. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रीयेतून १३ संचालक निवडले जाणार आहे. यामध्ये कारखानदार गट ७, महिला गट २ तर सोसायटी गट, इतर मागासवर्र्ग, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती या चार गटातून प्रत्येकी १ संचालक असे एकूण १३ संचालकाची निवड होणार आहे. वसाहतीत कारखानदार गटातील २६, सोसायटी गटातील ४ तर इतर १४३ असे एकूण १७३ मतदारांचा समावेश यादीत आहे. दरम्यान शक्रवारी ११ वाजता आमदार छगन भुजबळ यांनी अॅड . माणिकराव शिंदे यांच्या समवेत वसाहतीच्या सभासदांची बैठक घेऊन, उपस्थित सभासदाचा परिचय करून घेतला व बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचे आवाहन केले. निवडणुकीचा खर्च वसाहतीला परवडणार नाही, सामोपचाराने आणि सहमतीने विकासाचा अजेंडा पुढे नेऊ असे आवाहन उपस्थितांना केले. कारखानदार गटातून विक्रम गायकवाड, शाम कंदलकर, सुहास अलगट, विष्णू खैरनार, तुळशीदास पटेल, सौ. जैन, सुरेश परदेशी, सोसायटी गटातून आमदार पंकज भुजबळ, महिला गटातून सौ. पाटील व सौ. काबरा अनुसूचित जाती जमाती गटातून योगेंद्र वाघ, भटके विमुक्त जाती जमाती गटातून अॅड. नवीनचंद्र परदेशी, इतर मागासवर्गीय गटातून अनिल कुक्कर यांच्या नावाबाबत सहमती झाल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. या चर्चेनंतर व्यक्तीश: औद्योगिक वसाहतीच्या सभासदांचे म्हणणेही भुजबळ यांनी ऐकले.