सटाण्यात यादीत नाव शोधतांना मतदारांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:22 IST2019-04-29T13:22:49+5:302019-04-29T13:22:58+5:30
सटाणा : शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांना नावे सापडतांना दमछाक करावी लागत आहे.

सटाण्यात यादीत नाव शोधतांना मतदारांची दमछाक
सटाणा : शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांना नावे सापडतांना दमछाक करावी लागत आहे. मतदान केंद्र क्र. २२९ ते २३४ यांच्यावर काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. येवला तालुक्यातील शिसरगाव लौकी येथील केंद्रावर शुकशुकाट होता. तर ब्राहमणगाव येथे पारा ३९ वर असताना मतदारांनी रांगा लावलेल्या होत्या. चांदवड-देवळा मतदार संघात सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत २१.४४ टक्के मतदान झाले. येवल्यात ११ वाजेपर्यंत १७.७६ टक्के मतदान झाले. मालेगाव बाह्य मतदार संघात सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान १७.३५ टक्के मतदान झाले.