नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:47 IST2019-03-14T00:47:31+5:302019-03-14T00:47:50+5:30
मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाच्या यादीत नोंदणी झालेल्या १२ हजार ७७८ नवमतदारांना मतदान कार्ड वाटप सुरू झाले आहे.

नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप सुरू
मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाच्या यादीत नोंदणी झालेल्या १२ हजार ७७८ नवमतदारांना मतदान कार्ड वाटप सुरू झाले आहे. बीएलओंद्वारे नवमतदारांनी निवडणूक ओळखपत्र वाटप केले जाणार आहेत. उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गणेश मिसाळ यांनी मंगळवारी येथील तहसील कार्यालयात बीएलओंची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक शाखेला प्राप्त झालेले मतदार ओळखपत्र संबंधित नवमतदाराशी संपर्क साधून वाटप करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. १ जानेवारी २०१९ पर्यंत १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र नाव नोंदले गेले नसेल तरी त्या मतदारांनी आॅनलाईन पोर्टलवर मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नरेश बहिरम, तहसीलदार रमेश वळवी व बीएलओ उपस्थित होते.