शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मतदार नोंदणी अर्जाच्या कागदी पिशव्या बाजारात

By श्याम बागुल | Published: September 26, 2018 1:03 AM

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती व नव मतदारांच्या नोंदणीसाठी कोरे अर्ज वाटप करून नोंदणी करून घेत असतानाच आता मतदार नोंदणी अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या बाजारातील वस्तूंच्या विक्रीसाठी वापरात आणून आयोगाने प्रचार व प्रसाराचे नवीन तंत्र विकसित केले आहे.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती व नव मतदारांच्या नोंदणीसाठी कोरे अर्ज वाटप करून नोंदणी करून घेत असतानाच आता मतदार नोंदणी अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या बाजारातील वस्तूंच्या विक्रीसाठी वापरात आणून आयोगाने प्रचार व प्रसाराचे नवीन तंत्र विकसित केले आहे. नाशिकच्या बाजारपेठेत मतदार नोंदणीच्या कोऱ्या अर्जांची रद्दीत विक्री करण्यात येऊन त्यातून कागदी पिशव्या तयार करणाºया लहान-मोठ्या व्यावसायिकांना त्यामुळे आर्थिक हातभार लागला आहे.  राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सक्तीची प्लॅस्टिकवर बंदी करण्यात आली असून, प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी शासनस्तरावरूनच मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केला जात आहे. त्याला निवडणूक आयोगानेही हातभार लावला की काय अशी शंका या निमित्ताने घेतली जात असून, कागदी पिशव्या तयार करण्यासाठी भासणारी कागदाची टंचाई मतदार नाव नोंदणीच्या कोºया अर्जाने दूर करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून देशपातळीवर निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय राबविला जात आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय निवडणूक कार्यालये, बीएलओंकडे नवीन मतदार नोंदणीचे अर्ज नागरिकांना वाटप करण्यासाठी देण्यात आले आहेत. या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे यासाठी गावोगावी प्रचार रथ फिरवून प्रचार व प्रसारही केला जात असून, त्या माध्यमातून मतदार नोंदणी मोहीम जोरात सुरू असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र हेच मतदार नोंदणीचे अर्ज थेट रद्दीत विक्री केले जात असल्याचे आढळून आले आहे.मतदार नोंदणी अर्जाची रद्दी विकत घेऊन शहरात कागदी पिशव्या तयार करणाºया घरगुती व्यावसायिकांकडून या अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करण्यात आल्या असून, सध्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून या कागदी पिशव्यांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, लहान-मोठ्या व्यावसायिकांकडे मतदार नाव नोंदणी अर्जाच्या कागदी पिशव्या दिसू लागल्या आहेत. या अर्जाची खरोखर कोणी रद्दीत विक्री केली की आयोगाच्या सूचनेवरून मतदारांच्या घराघरांपर्यंत प्रचार व प्रसार होण्यासाठी कागदी पिशव्यांच्या माध्यमातून पोहोचण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक