शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शहरापेक्षा ग्रामीण भागात दिसला मतदारांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:21 IST

Maharashtra Assembly Election 2019सकाळी संथ सुरूवात झालेल्या देवळाली मतदारसंघातील मतदानाला दुपारनंतर काहीशी गती आाणि नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक केेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची अंमित आकडेवारी हाती आली तेंव्हा ५६.०५ टक्के इतके मतदान झाले.

नाशिकरोड : सकाळी संथ सुरूवात झालेल्या देवळाली मतदारसंघातील मतदानाला दुपारनंतर काहीशी गती आाणि नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक केेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची अंमित आकडेवारी हाती आली तेंव्हा ५६.०५ टक्के इतके मतदान झाले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वच पक्षांकडून धावपळ सुरू होती. सायंकाळच्या सुमारास याचा परिणाम दिसून आला. चोख बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व तयारीनिशी सकाळीच दाखल झाले होते. मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर सकाळी ८ वाजेपासून काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती, तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी आपला हक्क बजावून शेतीवर निघूनही गेले होते.देवळालीगाव सोमवारपेठ मनपा शाळा, तेलीगल्ली मनपा शाळा, विहितगाव मनपा शाळा, वडनेर मनपा शाळा, पिंपळगाव खांब, दाढेगाव, चेहेडी पंपिंग आदर्श विद्यामंदिर, सिन्नरफाटा मनपा शाळा, चेहेडी, गोरेवाडी मनपा शाळा, शिंदे, पळसे, एकलहरा, चाडेगाव, सामनगाव, देवळाली कॅम्प, भगूर, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, लहवित आदी ग्रामीण भागात सकाळी मतदारांची गर्दी झाली होती. दुपारनंतर पुन्हा मतदारांची गर्दी झाली होती. सर्वच मतदान केंद्राबाहेर प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती तर अन्य पक्ष आणि अपक्षांचे काही मोजक्या ठिकाणी बुथ लागले होते. मतदान केंद्राबाहेर मतदारांना नाव मतदार नावाच्या चिठ्ठ्या देण्यासाठी शासकीय बुथदेखील लावण्यात आले होते. देवळाली व नाशिकरोड भागात काही ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याने मतदारांना नाव शोधून जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मतदारांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये रिक्षा व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनची संख्या अधिक होती.सायंकाळी ६ वाजताच सर्व मतदान केंद्राबाहेरील प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. सर्व मतदान यंत्र, साहित्य, कर्मचारी यांना बसेसमधून पोलीस बंदोबस्तात दुर्गा उद्यान येथील मनपाच्या विभागीय कार्यालयात नेण्यात आले. सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत देवळालीगाव सत्कार पॉर्इंट ते मुक्तिधाम छायानिवासपर्यंत बॅरिकेट््स टाकून दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.कडेकोट सुरक्षादेवळालीगावातील दोन्ही मतदान केंद्रावर दुपारी चारनंतर अचानक मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले दरम्यान सर्व मतदान केंद्राच्या दोन्ही बाजुला १०० मीटर अंतरावर बॅरिकेटस् टाकुन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सर्वत्र अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर गैरप्रकार, आर्थिक प्रलोभन, अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांची गस्त देखील वाढविण्यात आली होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019deoli-acदेवळी