छगन भुजबळांकडून शिवभोजन केंद्रांची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:25 PM2020-04-04T17:25:07+5:302020-04-04T17:25:58+5:30

राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ यावेळेत पाच रुपये दराने एक लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.

Visiting Shiv Bhoj Kendra from Chhagan Bhujbal | छगन भुजबळांकडून शिवभोजन केंद्रांची पाहणी 

छगन भुजबळांकडून शिवभोजन केंद्रांची पाहणी 

Next
ठळक मुद्देरेशन दुकानांनाही भेट : सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनानाशिक शहरातील रेशन दुकान, शिवभोजन केंद्र, किराणा दुकान पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून, राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ यावेळेत पाच रुपये दराने एक लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील रेशन दुकान व शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन रेशन दुकानावर धान्य वितरण करताना तसेच शिवभोजन केंद्रावर सोशल डिस्टन्ंिसग आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना दिल्या.


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य व शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मात्र या योजना राबवित असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन होऊन गरीब व गरजू नागरिकांना जेवण व अन्नधान्य मिळते की नाही याबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील रेशन दुकान, शिवभोजन केंद्र, किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स आणि महानगरपालिकेच्या अन्नछत्राला भेट देऊन पाहणी केली. नाशिक शहरात गोरगरीब, बेघर, मजूरवर्ग, तसेच बाहेरून आलेल्या मजुरांसाठी शासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात २३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्र व अन्नछत्राची सुविधा केंद्र सुरू केली आहे. या निवारा केंद्रामध्ये एकूण ५७९ लोक दाखल असून, छगन भुजबळ यांनी नाशिक महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा क्र.१ म्हसरूळ येथील केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Visiting Shiv Bhoj Kendra from Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.