राहाता बाजार समितीच्या सदस्यांची लासलगावी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 01:00 IST2021-07-14T23:35:51+5:302021-07-15T01:00:46+5:30
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस राहाता बाजार समितीच्या सदस्य मंडळाने भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.

राहाता बाजार समितीच्या सदस्यांची लासलगावी भेट
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस राहाता बाजार समितीच्या सदस्य मंडळाने भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.
लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर कांदा, भुसार व तेलबिया तसेच इतर शेतीमालाच्या लिलावाचे कामकाज कशा पद्धतीने चालते यासंबंधीची माहिती तसेच बाजार समितीने शेतकरी बांधवांसाठी बाजार आवारांवर केलेली विविध विकासकामे, सोई व सुविधा, आदींची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, उपसभापती बाळासाहेब जपे, सदस्य चंद्रभान बावके, यशवंतराव चौधरी, शरद मते, अमोल थेटे, विजय लगड, माधवराव कडस्कर, सचिव उद्धवराव देवकर, लेखापाल सुभाष शिंदे यांनी घेतली. यावेळी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी माहिती दिली. यावेळी बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सहायक सचिव अशोक गायकवाड, सर्व लिलाव प्रमुख सुनील डचके, लेखापाल सुशील वाढवणे, पंकज होळकर, हिरालाल सोनारे, संतोष पोटे, नामदेव बर्डे, अरुण कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते.