नाशिकरोड : केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रशांत गोयल यांनी नुकतीच भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेत चर्चा केली.केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रशांत गोयल करन्सी अॅन्ड काइन्सचे संचालक मनमोहन सचदेवा, मुद्रणालय महामंडळाचे संचालक ए. के. श्रीवास्तव, अजय अग्रवाल, मुद्रणालय महाप्रबंधक एस. पी. वर्मा, सुधीर साहू, एम. सी. बेल्लपा, के. एन. महापात्रा, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेककर, के. डी. पाळदे, दिनकर खर्जुल, उत्तम रिकबे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, रमेश खुळे, उल्हास भालेराव, इरफान शेख, कार्तिक डांगे आदिंची यावेळी बैठक होऊन दोन्ही मुद्रणालयाबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत माहिती देतांना मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितले की, व्यवस्थापन येथील प्रेस व रिझर्व्ह बॅँकेच्या प्रेसच्या कामाची तुलना करते. मात्र नाशिकरोड येथील मुद्रणालय व अन्य ठिकाणच्या मुद्रणालयाच्या कामात व कामगारांमध्ये फरक आहे. मुद्रणालयातील जुन्या मशिनरीचे आधुनिकीकरण झालेले नाही. मात्र रिझर्व्ह बॅँकेच्या मुद्रणालयाच्या मशिनरी या आधुनिक असल्याचे गोडसे यांनी सांगितले.प्रेस मजदूर संघाचे निवेदनप्रेस मजदूर संघाच्या वतीने गोयल यांना अनुकंपातत्त्वावरील भरतीची अट पाचवरून पंचवीस टक्के करावी, जे कामगार स्वेच्छानिवृत्तीस तयार असतील त्यांच्या पाल्यांना मुद्रणालय महामंडळाने सेवेत घ्यावे, पासपोर्टइनलेचे काम देशात अन्यत्र न करता सुरक्षेतेच्या कारणास्तव नाशिकरोड प्रेसमध्येच करावे, ई-पासपोर्टसाठी नवीन मशीन लाइन मिळावी, जुन्या मशीन अपग्रेड कराव्यात, इतर देशांची पोसपोर्ट, चलनी नोटा व गोपनीय कागदपत्रे छपाईचे काम नाशिकरोड प्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करावे,सर्व राज्यांच्या एक्साइज सील छपाईचे काम मिळावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
अर्थसचिव गोयल यांची मुद्रणालयांना भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:14 IST