खंबाळे, बेहेडमाळ शाळांना संगणक संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:15 IST2021-03-16T04:15:26+5:302021-03-16T04:15:26+5:30

पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले संगणक संच पंचायत समिती उपसभापती पुष्पा पवार ...

Visit computer sets to Khambale, Behedmal schools | खंबाळे, बेहेडमाळ शाळांना संगणक संच भेट

खंबाळे, बेहेडमाळ शाळांना संगणक संच भेट

पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले संगणक संच पंचायत समिती उपसभापती पुष्पा पवार यांच्या हस्ते दोन्ही शाळांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, भारती कळंबे, धनश्री कुंवर, केंद्रप्रमुख पुष्पा गीत, समन्वयक शिंदे , विशाल जाधव, याकूब शेख, नितीन पठाडे, हेमंत भोये, सुनंदा सोनार, सरपंच जनार्दन राऊत, पोलीसपाटील सोमनाथ भोये, अध्यक्ष दिलीप सहारे, मुख्याध्यापक गणू राऊत, रणधीर कोळी, सुशीला भांगरे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो - १५ पेठ १

बेहेडमाळ शाळेस संगणक संच प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी पुष्पा पवार, सरोज जगताप, प्रशांत जाधव, भारती कळंबे, धनश्री कुंवर, केंद्रप्रमुख पुष्पा गीत आदी.

Web Title: Visit computer sets to Khambale, Behedmal schools