शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास नांगरे पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त?, डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:52 IST

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सिंगल यांनी त्यांच्या बदलीच्या चर्चेला सकारात्मक दुजोरा दिला असून, नवे आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.मात्र राज्याच्या गृहविभागाकडून सिंगल यांच्या बदलीचे आदेश अद्याप पारीत करण्यात आलेले नाहीत. औरंगाबाद महानिरीक्षकपदी डॉ. रवींद्र सिंगल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सांगली जिल्ह्यातील नांगरे पाटील मूळ रहिवासी असल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटील यांची नाशिकला पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. 

कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्थान अन् पोलीस सेवेते बेधडक काम करणारे आयपीएस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटलांना सर्वच ओळखतात. विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे त्यांचे मूळ गाव आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा अतिशय कष्टप्रद होता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेत येणाऱ्या तरुणांसाठी विश्वास नांगरे पाटील हे आदर्श आहेत.विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत भूषवलेली पदं

  • लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
  • पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलNashikनाशिक