शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विश्वास नागरे-पाटील यांचा नाशकातील टवाळखोरांना दणका ; आयुक्तपदाची सुत्र सांभाळताच ११७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 16:24 IST

नाशिक शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागातून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे टवाळखोर शहराच्या विविध भागांत एकत्र जमून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्यांचावर कारवाई करण्यत आली असून पोलीसांच्या या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बाईकराईडींग व टवाळखोळी करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रीया नागरिकांमध्ये उमटत आहे. 

ठळक मुद्देविश्वास नागरे- पाटील यांचा टवाळखोरांना दणकाशांतता भंग करणाऱ्या ११७ जणांवर कारवाई टवाळखोरांवर गुन्हे दाखल झाल्याने कारवाईचे स्वागत

नाशिक  : शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागातून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे टवाळखोर शहराच्या विविध भागांत एकत्र जमून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्यांचावर कारवाई करण्यत आली असून पोलीसांच्या या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बाईकराईडींग व टवाळखोळी करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रीया नागरिकांमध्ये उमटत आहे. नाशिक शहर पोलिसांनी दि. ६ व ७ रोजी अंबड, आडगाव, भद्र्रकाली, इंदिरानगर, गंगापूर, सातपूर भागात सातपेक्षा जास्त गुन्हे दाखल करून सुमारे १२० संशयित टवाळखोरांवर कारवाई केली आहे. अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार विजय शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिडकोतील स्टेट बँक चौकात १०ते १२ अज्ञात संशयित बुधवारी (दि.६) रात्री ८ वाजता बेकायदेशीररीत्या रात्री एकत्र जमून रस्ता अडविताना पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, तर पंचवटी कॉलेजसमोरून  गुरुवारी १८ ते  १९ वर्षीय भगवान टोचे, पंकज शिंदे,  ऋषिकेश साळवे,  श्?वेतांबर जोशी आणि अभिजित बोराडे आदी संशयितांनी एकत्र जमून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आले. यासह शालिमार येथील नेपाळी कॉर्नर येथे जितेश जीवन वाघेला,  दीपक सुरेशचंद्र अग्रवाल,  संदीप हाबूसिंग जाधव , इम्रान हारुण खान , सागर जीवन वाघेला व ताहेर इब्राहिम बेग आदी सर्व संशयित सार्वजनिक रस्त्यावर शांततेचा भंग करताना आढळून आले,त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.  तर पाथर्डी फाटा येथील रायबा हॉटेलसमोरच्या रस्त्यावर गुरुवारी  सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संतोष आत्माराम पवार, गणेश शंकर माळी, गजानन बाबूराव वाघमारे, हरी भगवान कोकाटे, संतोष गणेश कराळे व जनार्दन रायबा खंदारे हे संशयित सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले असता  त्यांना पोलिसांनी अटक केले. 

सातपूर-गंगापूर रोड गंगापूूर रोडवरील ध्रुवनगर बस स्टॉपच्या मागे गौरव अशोक चौधरी, रवींद्र्र सोमनाथ मटाले, योगेश रंगनाथ गुंबाडे, पवन विठ्ठल गवई व सुधाकर दशरथ वाठोरे  यांना गुरुवारी  रात्री सव्वादहा वाजता एकत्र राहून आरडाओरड करताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी अटक केले. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना जामीनावर सोडण्यात आले. तर सातपूरच्या स्वारबाबानगर येथेही रात्री दहा वाजता पोलिसांनी टवाळ खोरांवर कारवाई केली. या ठिकाणी पवन चंद्रकांत पवार,देवानंद लहुजी काळे, अविनाश निरंजन शिंदे, अमीन रशीद शेख,  हेमंत दिनकर सोनवणे, कमलेश गौतम जाधव, इस्माईल रफिक शेख, नीलेश गौतम जाधव यांच्यासह ५० ते ६० संशयितांना कोणत्याही परवानगीशिवाय घोषणाबाजी करताना व रॅली काढताना आढळून आल्याने पोलिसांनी अटक करून त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले आहे.  

भद्रकाली -गंजमाळ भद्रकालीतील खडकाळी सिग्नलजवळ असलेल्या राईस मिलजवळही पोलीसांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास  कारवाई केली. यावेळी गोपी भीमा आचारी, मुजफ्फर शाकीर कुरेशी, वसिम रईस मोहंमद बंजारे, सलिम माजिद खान व अबिद अहमद हुसेन हे संशयित सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर शांततेचा भंग करताना पोलिसांना आढळून आल्याने त्यांना अटक करून जामीनावर सोडण्याच आले. गंजमाळ येथील कोमल कुशन्ससमोर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास  वाजता मोझेस उत्तम लांडगे, विशाल राजू चिलवंते, दीपक कारभारी जोंधळे, सुधाकर गणपत जाधव, आनंद हरी जाधव, अमीर मोईनोद्दीन शेख व सनी नितीन वारे आदी शांततेचा भंग करताना पोलिसांना आढळून आल्याने त्यांना अटकेनंतर जामीनावर सोडण्याच आले. भद्रकालीतील तलावडी व व्हिडीओ गल्लीत येथे सायंकाळी सव्वापाच व रात्री सव्वादहा वाजता पोलिसांनी कारवाई केली. यात बाळासाहेब किसन पाईकराव, विशाल बाळासाहेब सदन, रवी सुकळा वाळे, जलिश जलील मोहंमद ठाकूर, नंदू गंगाधर क्षीरसागर, इरफान सलिम पठाण, जय त्र्यंबक लभडे, दीपक हरिभाऊ तोकडे, शामसिंग आत्माराम चव्हाण, कल्लू रामसुखी चव्हाण व नागराव शेषराव पिंगळे यांना पोलिसांनी टवाळखोरी करताना अटक केली. या सर्वांची पोलिसांनी कसून चौकशी करीत पुन्हा अशा प्रकारे शांततेचा भंग न करण्याची तंबी देत त्यांना जामीनावर सोडण्यात आले. दरम्यान अशा प्रकारे शहरातील विविध भागातून सुमारे ११७ ते १२० टवाळखोरांवर शहर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे अशाप्रकारे शहरातील विविध चौकांमध्ये जमून सर्वसामान्यांना त्रास देणाºया व छेडछाड करणाºया टवाळखोरांना जरब बसण्यास मदत होणार असल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील