विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:41 IST2019-09-20T23:00:45+5:302019-09-21T00:41:19+5:30

महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishwakarma Pujan Day Ceremony | विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात

विश्वकर्मा पूजन दिन कार्यक्रमप्रसंगी बोलताना सुदाम खैरनार. समवेत रमेश गाडकेर, राहुल कुलरिया, लालबहादूर विश्वकर्मा, नाना खैरनार आदी.

नाशिक : महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंचवटी परिसरातील संत जनार्दन स्वामी आश्रम हॉलमध्ये झालेल्या विश्वकर्मा पूजन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुतार लोहार संघाचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नाना खैरनार, अमरचंद शर्मा, अध्यक्ष रमेश गाडेकर, उपाध्यक्ष राहुल कुलरिया, सचिव लालबहादूर विश्वकर्मा, ओमप्रकाश जांगीड, लक्ष्मीनारायण जांगीड, खेतराम सुतार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमापूजन व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी सुनील पोपलघर, सत्यनारायण जांगीड, छोटेलाल विश्वकर्मा, राकेश शर्मा, मोतीलाल मालवीय, कमलेश विश्वकर्मा, कन्हैया विश्वकर्मा, सचिन सूर्यवंशी, काशीनाथ जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: Vishwakarma Pujan Day Ceremony