नियम भंग करणाऱ्यांची येवल्यात ३ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:20 IST2021-03-25T19:20:27+5:302021-03-25T19:20:53+5:30

येवला : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील तीन दुकाने ३१ मार्च पर्यत सील करण्यात आली आहेत.

Violators seal 3 shops in Yeola | नियम भंग करणाऱ्यांची येवल्यात ३ दुकाने सील

नियम भंग करणाऱ्यांची येवल्यात ३ दुकाने सील

ठळक मुद्देवाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासनॅॲक्शन मोडवर आले आहे.

येवला : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील तीन दुकाने ३१ मार्च पर्यत सील करण्यात आली आहेत.

तहसिलदार प्रमोद हिले,महसूल विभागाच्या पथकासह शहरात पाहणी करत असताना नियमांची
पायमल्ली करणाऱ्या जब्रेश्वर खुंट येथील पुष्कराज ज्वेलर्स, बाजारपेठेतील अथर्व गिफ्ट हाऊस व विंचूर चौफुली येथील न्यू तृप्ती फरसाण या दुकानांवर सिलबंदची कारवाई करण्यात आली. या वेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी उपस्थित होते. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासनॅॲक्शन मोडवर आले आहे.

Web Title: Violators seal 3 shops in Yeola