शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे उल्लंघन : १८ लाखांची दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:01 IST

नाशिक : दुचाकी अपघात, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी तसेच गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आलेली वाहनतपासणी मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली़ स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या स्पेशल ड्राईव्हमध्ये शनिवारी (दि़१७) २५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली़ यावेळी नियमांचे उल्लंघन करणाºया ३ हजार ६२० हून अधिक वाहनधारकांकडून अठरा लाख १५ हजार रुपयांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़

ठळक मुद्देपोलिसांची दुसऱ्या दिवशीही हेल्मेट कारवाई ; २५ हजार वाहनांची तपासणी

नाशिक : दुचाकी अपघात, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी तसेच गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आलेली वाहनतपासणी मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली़ स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या स्पेशल ड्राईव्हमध्ये शनिवारी (दि़१७) २५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली़ यावेळी नियमांचे उल्लंघन करणाºया ३ हजार ६२० हून अधिक वाहनधारकांकडून अठरा लाख १५ हजार रुपयांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती साधारण वर्षभरापूर्वीच लागू करण्यात आली असून, जानेवारीपासून पुणे शहरातही लागू केली जाणार आहे़ हेल्मेटमुळे अनेक गंभीर अपघातातही चालकाचे प्राण वाचले आहेत़ मात्र, असे असूनही हेल्मेट वापराबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील १३ पोलीस ठाणे हद्दीतील २६ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पोलिसांना शहरातील सामाजिक संस्था तसेच ट्रॅफिक अ‍ॅम्बेसिडर यांनी सहभाग घेऊन नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करून जनजागृती केली़

शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या कारवाईसाठी आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी २५० कर्मचारी तर शहर वाहतूक विभागाचे दहा अधिकारी, २२५ कर्मचारी सहभागी झाले होते़ वाहतूक नियमांचे पालन तसेच हेल्मेट, सीट बेल्ट यांचा स्वत:च्याच सुरक्षिततेसाठी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़

दोन दिवसांत २८ लाखांची दंडवसुलीशहर पोलीस आयुक्तालय हद्दीत शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या या वाहन तपासणीतील दोन दिवसांत ४५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली असून, २८ लाख १५ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे़ आर्थिक दंडवसुली हा उद्देश नसून वाहनधारकांची सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य आहे़ मात्र, वारंवार आवाहन करूनही हेल्मेट परिधान न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने हा स्पेशल ड्राइव्ह घेण्यात आला आहे़८० टक्के दुचाकीस्वारांनी केला हेल्मेटचा वापरपोलीस आयुक्तालय हद्दीत शुक्रवारी राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये पोलिसांनी कडक कारवाई केल्याने शनिवारी बहुतांशी दुचाकीचालक हे हेल्मेट घालून वाहन चालवित असल्याचे चित्र शहरात दिसून आले़ पोलिसांच्या या मोहिमेचा सकारात्मक परिणाम म्हणजे सुमारे ८० टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते़ त्यामुळे शनिवारी पोलिसांना कारवाई करणे अधिक सोपे गेले़ दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील बहुतांशी दुचाकी रस्त्यावरून गायब झाल्याचे चित्र होते़

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस