शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोरोनामुळे द्राक्षबागा संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 8:41 PM

खेडलेझुंगे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्वत्र १४४ लावून बंद पुकारला आहे. त्यामुळे बागा विकायच्या कशा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतमालाचे डोळ्यांदेखत नुकसान होत आहे.

ठळक मुद्देउत्पादकांना फटका : जमावबंदी आणि व्यापाऱ्यांच्या धोरणामुळे अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कखेडलेझुंगे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्वत्र १४४ लावून बंद पुकारला आहे. त्यामुळे बागा विकायच्या कशा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतमालाचे डोळ्यांदेखत नुकसान होत आहे.राज्यात जमावबंदी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतमजूर कामावर येण्यास नकार देत आहेत. व्यापारीही शेतावर येत नाहीत. त्यामुळे शेतमाल आणि महागड्या द्राक्षबागांवर झालेल्या खर्चाचा विचार करून शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच व्यापाºयांना योग्य भावातच माल खरेदी करण्याबाबत सुचित करणे गरजेचे आहे. सचिन सानप, धारणगाव वीर, द्राक्ष बागायतदार.कोरोनाचे थैमान बघून सरकारने नोकरदारवर्गाला दिलासा दिला की, घरी बसून काम करा, नाहीतर कंपनी बंद ठेवा, कंपन्यांनाही सक्त ताकीद दिली की, कुणाचेही वेतन कापू नका. पण द्राक्ष उत्पादक शेतकºयांवर कोणाचेच लक्ष नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष हे असं पीक आहे की, ते साठवूनपण ठेवू शकत नाही. त्यामुळे अवकाळीतून वाचविलेल्या द्राक्षबागा वेळीच योग्य दराने विकल्या गेल्या नाही तर शेतकरी पूर्णत: हतबल होणार आहे.देशावर कोणतेही संकट आले तरी त्याचा फटका शेतकºयांना बसल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शेतकºयांचा विचार सर्वस्तरावरून होणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलेही संकट आले की त्यात सापडतो तो बळीराजा.यावर्षी द्राक्षबागा छाटल्यानंतर अवकाळीने खूप मोठे नुकसान केलेले आहे. अवकाळीने पोंग्यातील बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे. जेव्हा अवकाळी बरसत होता तेव्हा शेतकºयांनी खूप मेहनत घेतलेली आहे. वेगवेगळ्या औषधांची फवारणी करून बागा वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. वातावरणात झालेल्या बदलांप्रमाणे औषधांची फवारणी प्रत्येक दिवशी केलेली आहे. अवकाळीच्या माºयात अर्ध्या बागा उद्ध्वस्त झाल्या. यादरम्यान झालेला सर्व खर्च शेतकºयांच्या अंगाशी आलेला आहे.यातून शेतकरी सावरत असताना शिल्लक बागेवरती आशा लावून शेतकरी बसलाय तर आता या कोरोनाला ऊत आलाय.सध्या कोरोनामुळे व्यापारीवर्गही वेगवेगळी कारण देऊन पडेल भावात मालाची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक संकट गडद होत चाललेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या सत्र सुरू होते की काय, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. फक्त शहरी भागामध्ये लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे द्राक्षमणी लाल होऊन ते उलत आहे. त्यामुळे द्राक्षमणी फुटून त्यात माशी, मिलिबर्ग, बुरशी, मावासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे काही शेतकºयांच्या संपूर्ण बागांचे नुकसान होत आहे.आज रोजी काढणीला आलेले द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दिवसागणिक वाढत असलेला उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्ष मण्यांना लाल चट्टे पडत आहे. त्यामुळे निर्यातक्षम असलेले द्राक्ष कवडी मोलाने विक्री करावी लागत आहे.काही द्राक्षांचे घड वेलीवरच सुकत आहेत. त्यातच पक्षीही मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. पक्षी द्राक्ष, शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. पक्षी द्राक्षाचे घड रिकामे करत आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतपिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे.मोरांमुळे पिकाचे नुकसानपरिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर आल्याने परिसरातील पिकांची नासाडी करत आहेत. पीक वाचवायच्या नादात झालेल्या खर्चाचा हिशोब केला असता मिळणारे उत्पन्न हे त्यापेक्षाही कमी असल्याने शेतकरी कर्जात बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.आधीच डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर त्यात निर्माण होणारीही नैसर्गिक/ मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी पुरता हैराण झालेला आहे.निर्यातक्षम द्राक्ष घडांमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने बदल होत आहे. द्राक्षांच्या घडाचा वरील अर्धा भाग लाल आणि खालील भाग हिरवा राहत आहे. साखरेच्या प्रमाणात बदल होत आहे. त्यामुळे द्राक्षांना योग्य भाव मिळेना. त्यातच कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याचे सांगून व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे काढणीला आलेले द्राक्ष झाडावरच सुकण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आर्थिक संकटात वाढ होऊन शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.- गोपीनाथ गिते, द्राक्ष बागायतदार खेडलेझुंगे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी