विंचूरला दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:05 IST2019-02-16T17:05:31+5:302019-02-16T17:05:42+5:30

भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध

Vinchur to the statue of terrorists | विंचूरला दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन

विंचूरला दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन

ठळक मुद्दे विंचूर तीनपाटी येथे शिवसैनिकांच्या वतीने संताप व्यक्त

विंचूर : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर तीनपाटी येथे शनिवारी (दि.१६) सकाळी शिवसेनेच्या वतीने दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून शिवसैनिकांच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख निवत्ती जगताप, तालुका प्रमुख प्रकाश पाटील, माजी जि. प.सदस्य ज्ञानेश्वर पवार, उपतालुका प्रमुख फिरोज मोमीन, शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले, गटप्रमुख प्रवीण सालगुडे ,गणप्रमुख विंचूर निलेश दरेकर, उपशहर प्रमुख सद्दाम शेख, प्रमोद पाटील, विकी काळे ,राहुल करपे, दीपक जाधव, राजू मोरे, किरण शिरसाठ, बबलू शेख, मोहसिन शेख, सुशील सोनी यांसह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Vinchur to the statue of terrorists

टॅग्स :Nashikनाशिक