प्लॅस्टिक बंदीसाठी ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 09:43 PM2019-10-02T21:43:00+5:302019-10-02T21:45:08+5:30

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले असून, दोन प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात एक कापडी पिशवी असा अनोखा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. आज सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

Villagers vow to ban plastic | प्लॅस्टिक बंदीसाठी ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा

प्लॅस्टिक बंदीसाठी ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा

googlenewsNext
ठळक मुद्देताहाराबाद : महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले असून, दोन प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात एक कापडी पिशवी असा अनोखा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. आज सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
गावातून स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी साठी जनजागृती फेरी काढण्यात आली. गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याच ठिकाणी ग्रामस्थांनी स्वच्छता व प्लॅस्टिक बंदीची प्रतिज्ञा ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली. याप्रसंगी सरपंच किशोर भामरे, उपसरपंच केवळबाई माळी, सदस्य साहेबराव भामरे, नरेंद्र बोरसे, विश्वास खैरनार, सविता भामरे, सुरेखा भामरे, रु पाली भामरे, सुरेश गांगुर्डे, महेश जगताप, मधुकर गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्लॅस्टिक पिशवी ग्रामस्थांसाठी रोज वापराची गरज बनली हा वापर थांबविण्यासाठी ग्रामस्थांना पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय प्लॅस्टिक पिशवी हद्दपार होणार नाही म्हणून दोन प्लॅस्टिक पिशवी ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा व एक कापडी पिशवी मोफत घेऊन जा हा अभिनव उपक्र म सरपंच किशोर भामरे व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या एकमताने हाती घेण्यात आला आहे.
योगेश भामरे, ग्रामसेवक.
 
Web Title: Villagers vow to ban plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.