गुगुळवाडला साथीच्या आजाराने ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:31+5:302021-09-07T04:17:31+5:30
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने उपचारासाठी झोडगे किंवा मालेगांव येथे जावे लागते. मात्र, ज्यांच्याजवळ वाहन सुविधा आहे त्यांना शक्य ...

गुगुळवाडला साथीच्या आजाराने ग्रामस्थ त्रस्त
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने उपचारासाठी झोडगे किंवा मालेगांव येथे जावे लागते. मात्र, ज्यांच्याजवळ वाहन सुविधा आहे त्यांना शक्य आहे, परंतु ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांची मोठी परवड होत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात वैद्यकीय सुविधेअभावी ग्रामस्थांचे हाल होत असून, फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय अधिकारी गावाकडे फिरकायलाही तयार नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सर्व गावाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोणी आजारी पडल्यास शेती काम सोडून दवाखान्याचे खेटे मारण्यात वेळ जातो. शासनाने येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा द्यावी. वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनदा गावात आरोग्य तपासणीसाठी द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
कोट...
उपचारांसाठी झोडगे किंवा मालेगांव जावे लागते मात्र वाहन व्यवस्था अभाव असल्याने हाल होत आहेत. सद्य:स्थितीत गावातील नागरिक नव्वद टक्के आजारी आहेत. आमचे गाव आडवळणी असल्याने कोणी इकडे ढुंकूनही पाहत नाही.
- भाऊसाहेब निकम, ग्रामस्थ