उमराणे बाजार समिती सभापतिपदी विलास देवरे
By Admin | Updated: March 16, 2016 08:26 IST2016-03-16T08:26:10+5:302016-03-16T08:26:11+5:30
निवड : उपसभापतिपदी विजया खैरनार

उमराणे बाजार समिती सभापतिपदी विलास देवरे
मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विलास मोहनराव देवरे यांची, तर उपसभापतिपदी वऱ्हाळेच्या विजया खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र शेळके यांनी काम पाहिले. सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीसाठी बाजार समिती कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. सभापतिपदासाठी संचालक बाळासाहेब अहिरे यांनी विलास देवरे यांचे नाव सुचविले. त्यास विश्वास बस्ते यांनी अनुमोदन दिले. उपसभापतिपदासाठी संचालक हिरामण खैरनार यांनी विजया खैरनार यांचे नाव सुचविले. त्यास संजय अहिरे यांनी अनुमोदन दिले. सभापती, उपसभापतिपदासाठी अन्य अर्ज दाखल न झाल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली. बैठकीस संचालक राजेंद्र देवरे, प्रशांत देवरे, संजय देवरे, प्रवीण बाफणा, नथा देवरे, सरला खैरनार, बाळासाहेब आहेर, विश्वास बस्ते, मिलिंद शेवाळे, महेंद्र आहेर, हिरामण खैरनार, शिवाजी ठाकरे, संजय अहिरे, सुंदराबाई झारोळे, रामराव ठाकरे, शोभा आहेर उपस्थित होते. सचिव नितीन जाधव व सहसचिव सोपान दुकळे यांनी निवडणुकीसाठी मदत केली. स्वतंत्र बाजार समितीचे शिल्पकार निवृत्ती देवरे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई देवरे, विलास देवरे यांच्या मातोश्री कासूबाई देवरे, सरपंच सोनाली देवरे, सुभाष देवरे, सुदाम देवरे, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब देवरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)