आज विजयादशमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:59 AM2019-10-08T00:59:42+5:302019-10-08T01:00:04+5:30

नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे.

 Vijayadashmi today | आज विजयादशमी

आज विजयादशमी

Next

नाशिक : नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघनाची प्रथा असून, शहरात विविध ठिकाणी रावणाचे दहन करून विजयोत्सवासोबतच आपट्याची पाने वाटून सोने लुटण्याची प्रथा आहे.
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा करण्यात येतो. सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच शहरात पंचवटीतील गोदाघाटावर आणि गंगापूररोड परिसरासह शहरातील विविध भागात रावणदहन करण्याची तयारी करण्यात आली आहे.
सोने खरेदीला महत्त्व
पूर्वी दसºयाच्या काळात शेतातील पहिले पीक येत असल्याने घरात पैसा येऊन त्यातून सोने खरेदी केली जात असे. त्यामुळे दसºयाच्या मुहूर्तावर घरात धन-धान्य यावे अशी नागरिकांची मानसिकता असल्याने दसºयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी केलेली गुंतवणूक वृद्धिंगत होते. त्यामुळे यादिवशी सोने खरेदी करून अनेकजण गुंतवणूक करतात.

Web Title:  Vijayadashmi today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.