शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ओझर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी विजय शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 12:47 PM

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून ...

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून विकास भट्टड यांची निवड करण्यात आली. मावळते चेअरमन रवींद्र भट्टड तसेच संदीप अक्कर व प्रशांत चौरे यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्याने बँकेच्या भिकाजी भाऊराव शिंदे सभागृहात तालुका सहनिबंधक अभिजित देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडप्रक्रियेत विजय शिंदे व अरुण पवार यांना अनुक्रमे सूचक म्हणून रवींद्र भट्टड व संदीप अक्कर यांनी तर रत्नाकर कदम व राजेंद्र शिंदे यांनी अनुमोदन दिले. दोघांचे एक एक अर्ज आल्याने देशपांडेंनी सदर निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर भालचंद्र कासार यांनी विकास भट्टड यांच्या नावाची जनसंपर्क संचालक म्हणून घोषणा केली. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. निवडीनंतर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, मोहन पिंगळे, भास्कर शिंदे, भालचंद्र कासार, मेडिकल असोसिएशन व प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष येवला व महाव्यवस्थापक शंकर शिंदे व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी संचालक नवनाथ मंडलिक, भालचंद्र कासार, रत्नाकर कदम, वसंत गवळी, भारत पगार, शरद सिन्नरकर, रउफ पटेल, लक्ष्मण सोनवणे, ज्ञानेश्वर आहेर, प्रशांत मोरे, प्रशांत चौरे, भारत पल्हाळ, जिजाबाई रास्कर, संजय सोनवणे, बाळासाहेब जाधव, मेघा पाटील आदी उपस्थित होते.---आज निफाडची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओमकोची ख्याती आहे. संस्थापकांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करू. एनपीए शून्यावर कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही सर्व संचालक मिळून बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवणार आहोत.- विजय शिंदे, चेअरमन, ओझर मर्चण्ट बँक.

टॅग्स :Nashikनाशिक