शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

गुडघेदुखी टाळण्यासाठी दक्षता महत्त्वाची : कासलीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:52 AM

गुडघेदुखी टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावे, समतोल आहार घ्यावा, पथ्यपाणी पाळावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्याचप्रमाणे गुडघ्यांचा विकार कितीही त्रासदायक असला तरी कृत्रिम गुडघे हा शेवटचा पर्याय अवलंबिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. विशाल कासलीवाल यांनी केले.

नाशिकरोड : गुडघेदुखी टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावे, समतोल आहार घ्यावा, पथ्यपाणी पाळावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्याचप्रमाणे गुडघ्यांचा विकार कितीही त्रासदायक असला तरी कृत्रिम गुडघे हा शेवटचा पर्याय अवलंबिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. विशाल कासलीवाल यांनी केले.नाशिकरोड येथे दत्त मंदिररोडवरील योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्याख्यानमालेत डॉ. कासलीवाल यांनी पाचवे पुष्प गुडघेदुखी व उपचार यावर गुंफले. गुडघे खराब होण्याच्या अनेक पायऱ्या असतात. जो रोज चालतो त्याला गुडघेदुखी होत नाही. काही व्यायाम करून आपण गुडघेदुखी कमी करू शकतो. गुडघ्याची झीज झाल्यावर मांडी घालून बसू नका. तसे केले नाही तर झीज वाढत जाते. एकदा झीज सुरू झाले की ती वाढतच जाते. अशावेळी खाली मांडी घालून बसणे टाळणे पाहिजे, त्याचप्रमाणे वजन वाढू न देता त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अनेकदा याबाबत नागरिक अनभिज्ञ असतात. तथापि माणसाचे एक किलो वजन वाढले, तर गुडघ्यावर पाच किलो भार पडतो. एक किलो वजन कमी केले, तर पाच किलो भार कमी होतो. चालण्याने गुडघेदुखी कमी होते, असे सांगून डॉ. कासलीवाल यांनी गुडघेदुखीवर नियंत्रणासाठी समतोल आहार घ्यावा, असा सल्ला दिला.गुडघे विकार असणाऱ्यांनी आहाराबाबत काळजी घेताना भोजनातून तेल-तूप एकदम बंद करू नये. ते गुडघ्यासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.तो करताना ग्रीनजीममधील व्यायामसाधनांचा उत्साहाने जास्त वापरू नका. त्यामुळे गुडघेदुखी वाढते. जागच्या जागी सायकलिंग सर्वांत महत्त्वाचा व्यायाम आहे. त्यामुळे मांडीचे स्नायू ताकदवान होतात. गुडघेदुखी थांबते. गुडघेदुखीत बर्फाची शेक अतिशय उपयुक्त ठरते, असेही ते म्हणाले. गुडघेदुखी असणाºयांनी आधारासाठी काठी वापरावी. त्यामुळे गुडघ्यावरील दबाव कमी होतो. उजवा गुडघा दुखत असेल तर डाव्या हातात काठी पकडावी. पायºयासारख्या चढ-उतरू नये. मांडीच्या स्नायूचे व्यायाम  केल्यास गुडघेदुखी कमी होते. गुडघ्यावरील ताण कमी झाला, तर दुखणे कमी होते, असेही शेवटी ते म्हणाले.आजचे व्याख्यानवक्ते : स्वाती पाचपांडेविषय : रम्य ते ज्येष्ठपण

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक