गुडघेदुखी टाळण्यासाठी दक्षता महत्त्वाची : कासलीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:52 AM2019-05-22T00:52:31+5:302019-05-22T00:53:23+5:30

गुडघेदुखी टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावे, समतोल आहार घ्यावा, पथ्यपाणी पाळावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्याचप्रमाणे गुडघ्यांचा विकार कितीही त्रासदायक असला तरी कृत्रिम गुडघे हा शेवटचा पर्याय अवलंबिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. विशाल कासलीवाल यांनी केले.

 Vigilance is important to avoid knee injury: Kasliwal | गुडघेदुखी टाळण्यासाठी दक्षता महत्त्वाची : कासलीवाल

गुडघेदुखी टाळण्यासाठी दक्षता महत्त्वाची : कासलीवाल

googlenewsNext

नाशिकरोड : गुडघेदुखी टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावे, समतोल आहार घ्यावा, पथ्यपाणी पाळावे, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्याचप्रमाणे गुडघ्यांचा विकार कितीही त्रासदायक असला तरी कृत्रिम गुडघे हा शेवटचा पर्याय अवलंबिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. विशाल कासलीवाल यांनी केले.
नाशिकरोड येथे दत्त मंदिररोडवरील योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्याख्यानमालेत डॉ. कासलीवाल यांनी पाचवे पुष्प गुडघेदुखी व उपचार यावर गुंफले. गुडघे खराब होण्याच्या अनेक पायऱ्या असतात. जो रोज चालतो त्याला गुडघेदुखी होत नाही. काही व्यायाम करून आपण गुडघेदुखी कमी करू शकतो. गुडघ्याची झीज झाल्यावर मांडी घालून बसू नका. तसे केले नाही तर झीज वाढत जाते. एकदा झीज सुरू झाले की ती वाढतच जाते. अशावेळी खाली मांडी घालून बसणे टाळणे पाहिजे, त्याचप्रमाणे वजन वाढू न देता त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अनेकदा याबाबत नागरिक अनभिज्ञ असतात. तथापि माणसाचे एक किलो वजन वाढले, तर गुडघ्यावर पाच किलो भार पडतो. एक किलो वजन कमी केले, तर पाच किलो भार कमी होतो. चालण्याने गुडघेदुखी कमी होते, असे सांगून डॉ. कासलीवाल यांनी गुडघेदुखीवर नियंत्रणासाठी समतोल आहार घ्यावा, असा सल्ला दिला.
गुडघे विकार असणाऱ्यांनी आहाराबाबत काळजी घेताना भोजनातून तेल-तूप एकदम बंद करू नये. ते गुडघ्यासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
तो करताना ग्रीनजीममधील व्यायामसाधनांचा उत्साहाने जास्त वापरू नका. त्यामुळे गुडघेदुखी वाढते. जागच्या जागी सायकलिंग सर्वांत महत्त्वाचा व्यायाम आहे. त्यामुळे मांडीचे स्नायू ताकदवान होतात. गुडघेदुखी थांबते. गुडघेदुखीत बर्फाची शेक अतिशय उपयुक्त ठरते, असेही ते म्हणाले. गुडघेदुखी असणाºयांनी आधारासाठी काठी वापरावी. त्यामुळे गुडघ्यावरील दबाव कमी होतो. उजवा गुडघा दुखत असेल तर डाव्या हातात काठी पकडावी. पायºयासारख्या चढ-उतरू नये. मांडीच्या स्नायूचे व्यायाम  केल्यास गुडघेदुखी कमी होते. गुडघ्यावरील ताण कमी झाला, तर दुखणे कमी होते, असेही शेवटी ते म्हणाले.
आजचे व्याख्यान
वक्ते : स्वाती पाचपांडे
विषय : रम्य ते ज्येष्ठपण

Web Title:  Vigilance is important to avoid knee injury: Kasliwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.