शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मध्यरात्रीपर्यंत देखावे राहणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:05 IST

गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीतदेखील रात्री बारा वाजेपर्यंत केवळ पारंपरिक वाद्य वाजविण्यास परवानगी राहणार आहे. डीजे साउंड सिस्टिमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, डीजेचा वापर करणाºया मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार गणेशोत्सवातील अखेरचे तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी अनंत चतुर्दशीपर्यंत देखावे रात्री बारा वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रात्री दहा वाजेची अट या तीन दिवसांकरिता शिथिल करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने या परिपत्रकाच्या आधारे सांगितले. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे मध्यरात्रीपर्यंत बघण्याची संधी गणेशभक्तांना उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी उपाहारगृहदेखील मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे, जेणेकरून देखावे बघण्यासाठी येणाºया भक्तांची गैरसोय होणार नाही.गणेशोत्सवाचे पहिले सात दिवस केवळ रात्री दहा वाजेपर्यंत देखावे मंडळांना खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली.तीन दिवस गजबजणार शहरदहा वाजेनंतर रस्त्यांवरील गर्दी कमी होत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांचा परिसर शांत होत होता, मात्र अखेरचे तीन दिवस मंडळांच्या परिसरात भाविकांची गर्दी आणि देखावे बघण्याचा उत्साह रात्री १२ वाजेपर्यंत कायम राहणार आहे. रात्री बारा वाजेच्या ठोक्याला मंडळांना देखावे आणि पारंपरिक वाद्य मात्र काटेकोरपणे बंद करावे लागणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिकPoliceपोलिस