शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

एकलहरे शिवारात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:37 AM

गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे.

एकलहरे : गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. त्यामुळे हिंगणवेढा शिवारातून आपल्या बछड्यांसह बिबट्या आता एकलहरे शिवारात मुक्कामास आला असल्याची खात्री नागरिक लागले आहेत.गुरुवारी सायंकाळी ७ वाजता केदू पाटील राजोळे यांच्या उसाच्या शेतातून बिबट्या रस्ता ओलांडून समोरच्या उसाच्या शेतात लपून बसल्याचे लक्षात येताच, भाऊराव केदू राजोळे, रामदास पाटील डुकरे, संदीप राजोळे आदी शेतकऱ्यांनी बिबट्या उसाच्या शेतात लपल्याचे बघून तो हुसकावून लावण्यासाठी मोठ्या फटाक्यांचे बार उडविले, परंतु त्यानंतर पुन्हा सव्वानऊ वाजता पुन्हा त्याच रस्त्यावर सुकदेव दुसिंग व बारकू दुसिंग यांना बछड्यासह बिबट्याचे दर्शन झाले. त्यावेळीही नागरिकांनी फटाके फोडल्यामुळे बिबट्याने पलायन करून समोरच्या उसाच्या शेतात आश्रय घेतला. या ठिकाणी पिलांसह बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले. हिंगणवेढ्यात मुक्कामास असलेले हे बिबट्याचे कुटुंब एकलहरेत स्थलांतरित झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंगणवेढा येथील पिंजरा वन विभागाला हलवावा लागला. आता एकलहरे शिवारात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी आहे.गेल्या महिन्यात शेतातील घरासमोरुन बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेऊन फडशा पाडला. त्यानंतर वाळूवाटेवरील मळ्यात कोंबड्यांचा फस्त केल्या. आता पुन्हा आमच्या जवळच्याच उसाच्या शेतात बछड्यासह बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे आम्हाला रात्री बेरात्री घराबाहेर पडणे व शेताला पाणी देणे कठीण होऊ लागले आहे.- रामदास डुकरे-पाटील, एकलहरे

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक