विद्यादान हेच सर्वोत्तम दान: घनश्यामाचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:35 PM2020-02-18T23:35:44+5:302020-02-19T00:59:46+5:30

विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगावच येथे प्रवचनात केले.

Vidyadan is the best donation: Ghanshyamacharya Maharaj | विद्यादान हेच सर्वोत्तम दान: घनश्यामाचार्य महाराज

लासलगावी बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवात घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या हस्ते गोविंद प्रसाद पुरस्कार स्वीकारताना सुशीला आंबेकर. समवेत त्र्यंबकबाबा भगत, दिलीप डुंगरवाल, बाबासाहेब गोसावी, सुधा आहेर आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देलासलगावी बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव

लासलगाव : विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगावच येथे प्रवचनात केले.
बालाजी मंदिराच्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. मालेगावचे पंडित कैलास महाराज दायमा यांच्या पौरोहित्याखाली गरुड ध्वजारोहण, श्रीराम धून, श्री हनुमानसचालिसा पाठ कार्यक्रम घेण्यात आले. गुरुमहिमा या विषयावर शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा व गोविंद बालसंस्कार अंतर्गत गुरुआशिष कार्यक्रम संपन्न झाले. नवकलश अभिषेक करण्यात आला. यानिमित्त शोभायात्रा लक्ष्मी मंदिरपासून येथील भगवान बालाजी मंदिरापर्यंत काढण्यात आली.
शोभायात्रेत रत्नजडीत चित्ररथावर स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज विराजमान झाले होते, तर भगवान बालाजी तसेच गौरी महेश वर्मा यांनी साकारलेली सरस्वती देवी व कुमार वाघ याने साकारलेले श्री गणेश चित्ररथाचे विशेष आकर्षण होते.
स्वामीजींचे भाविकांनी मनोभावेपूजा करून दर्शन घेतले. शोभायात्रेत गोविंदसेवक दत्तात्रेय भांबारे यांनी तयार केलेले विविध चित्ररथ, त्र्यंबकबाबा भगत, साखरे महाराज तसेच विंचूर बॅण्डपथक, महावीर जैन वसतिगृह अधीक्षक डी.एफ. कोल्हापुरे, महावीर विद्यालयाचे प्रभाकर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लेजीम पथके सहभागी झाली होती.

Web Title: Vidyadan is the best donation: Ghanshyamacharya Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.