शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी अवघड :रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 17:24 IST

भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

ठळक मुद्देमहायुतीच्या जागा वाटपात आरपीआय़वर अन्यायरामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत नाराजी

नाशिक :भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.४) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. महायुतीच्या जागावाटपात आपण देवळाली, भूसावळसह आणखी काही जागांची मागणी केली होती. परंतु, उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आरपीआयवर अन्याय झाल्याची भावना पसरल्याने प्रचंड नाराजी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. महायुतीत आरपीआयला किमान १० जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्या आहेत. त्यातही मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघातून शिवसेने उमेदवार दिला आहे.त्यामुळे आमच्या वाट्याला केवळ पाच जागा येणार असल्याने या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  दरम्यान, आपल्यावर अन्याय होत असला तरी सत्तेत सहभाही होऊन अन्याय दूर करता येणार असल्याचे सांगतानाच आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकण्यासाठीच आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक  लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

युतीत नेहमीच गडबड भाजप आणि शिवसेनेदरम्यान विविध मुद्द्यावरील मतभेद सर्वश्रृत असून गतपंचवार्षिकमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही ते प्रकर्षाने दिसून आले असताना युतीत नेमहीच गडबड असल्याचे सांगतानाच आपणच मध्यस्थी करून ही गडबड दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची कल्पनाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपणच आणल्याने आज समाजात परिवर्तन दिसून येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv Senaशिवसेना