शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 20:29 IST

छगन भुजबळ यांनी येवल्यातून हॅट्ट्रिक केली आहे.

- धनंजय वाखारेनाशिक : जिल्ह्यातील येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्यासमोर स्वपक्षातूनच आव्हान उभे ठाकले असतानाच लगतच्या नांदगाव मतदारसंघातही त्यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातही सूर उमटू लागल्याने पित्याबरोबरच पुत्राचीही उमेदवारी धोक्यात असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे स्वत: येवल्यातून लढताना छगन भुजबळ आपल्या पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

२००४च्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाची निवड करत उमेदवारी केली आणि मोठ्या मताधिक्याने जिंकलीही. त्यानंतर २००९च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा येवल्यातून उमेदवारी करतानाच लगतच्या नांदगाव मतदारसंघातून आपले पुत्र पंकज यांचे राजकीय पदार्पण घडवून आणत त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी बहाल केली गेली. त्यावेळी ३६ वर्षांचे असलेल्या पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा २१ हजार ३६९ मतांनी पराभव केला होता. पंकज यांनी ९६ हजार २९२ मते मिळविली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ५३.३३ इतकी होती. त्यावेळी पंकज भुजबळ आणि संजय पवार यांच्यातच चुरशीचा सामना झाला होता.२०१४च्या विधानसभा निवडणुकीत येवल्यातून पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी करणा-या छगन भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकज भुजबळांना रिंगणात उतरविले. छगन भुजबळ यांनी येवल्यातून हॅट्ट्रिक केली, तर पंकज भुजबळ हे दुसऱ्यांदा विधानसभेत जाऊन पोहोचले. या निवडणुकीत पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचे सुहास कांदे यांचा १८ हजार ४३६ मतांच्या फरकाने पराभव केला होता. पंकज यांनी ६९ हजार २६३, तर सुहास कांदे यांना ५० हजार ८२७ मते मिळाली होती. भाजपचे अद्वय हिरे यांनी तिसºया क्रमांकाची मते घेत चुरस निर्माण केली होती.

आता होऊ घातलेल्या निवडणुकीत येवल्यातून छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच भुजबळ यांचे समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी उघडपणे उमेदवारीची मागणी करत छगन भुजबळांना थांबण्याचा सल्ला अप्रत्यक्षपणे दिला आहे. यापूर्वी २००९ मध्ये छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे हे आमने-सामने आले होते. त्यावेळी अपेक्षेप्रमाणे माणिकरावांचा पराभव झाला होता. मात्र, मागील निवडणुकीत माणिकरावांनी भुजबळांचे समर्थन करत त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. आता मात्र, भुजबळांकडून आश्वासनपूर्ती न झाल्याचा आरोप करत माणिकरावांनी शड्डू ठोकले आहेत.येवल्यात छगन भुजबळ यांना स्वपक्षातूनच विरोध सुरू झाला असतानाच नांदगाव मतदारसंघातूनही पंकज भुजबळ यांच्या विरोधात फटाके वाजू लागले आहेत. कॉँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, उघडपणे कुणीही मत व्यक्त करत नसले तरी भुजबळांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत उत्सुकता दिसून येत नाही. त्यातच शिवसेना-भाजप युती झाल्यास पंकज भुजबळांना मतदारसंघ सांभाळणे अवघड होऊन बसणार असल्याचे चित्र आहे.आघाडीची सत्ता असताना छगन भुजबळ यांनी येवल्याबरोबरच नांदगावकडेही वैयक्तिक लक्ष घातले होते. काही विकासकामे मोठ्या भुजबळांच्या दबदब्यामुळेच झाल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या पंचवार्षिक काळात विकास खुंटल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, खुद्द राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पंकज भुजबळांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळPankaj Bhujbalपंकज भुजबळNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभा