बाधितांचे करणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:17 PM2020-07-14T20:17:59+5:302020-07-15T01:17:47+5:30

मालेगाव : शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह खाजगी रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या कोवीड केंद्रातुन कोरोनाबाधीतांचे नवीन बसस्थानका जवळ असलेल्या सहारा रूग्णालयामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.

The victims will relocate | बाधितांचे करणार स्थलांतर

बाधितांचे करणार स्थलांतर

Next

मालेगाव : शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह खाजगी रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या कोवीड केंद्रातुन कोरोनाबाधीतांचे नवीन बसस्थानका जवळ असलेल्या सहारा रूग्णालयामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.
महापालिकेने घेतलेल्या या रूग्णालयामध्ये सुमारे अडीचशे बाधीतांची बेड, आॅक्सीजनसह व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सर्व रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार करणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. शिवाय बाधीतांंनाही वेगळ्या केंद्रामध्ये दाखल करण्याऐवजी एकाच ठिकाणी उपचार मिळणार असल्याने त्यांची सोय होणार आहे.
या संदर्भात वैद्यकीय समितीने रूग्णालयाची पाहणी केली होती. त्यात दोनशे रुग्णांसाठी प्रसाधन गृह व स्नानगृहाची शिफारस करण्यात आली होती. प्रसाधन व स्नानगृह बांधण्याचे काम सुरू असल्याने सदर स्थलांतर लांबले आहे. सध्या जुन्या मुंबई- आग्रा महामार्गावरील फारहान हॉस्पिटल, मालेगाव कॅम्पातील मसगा महाविद्यालय आणि किदवाईरोडवरील हज हाऊसमध्ये बाधीत रुग्णांना ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने संस्थाचालकांकडून शाळा-महाविद्यालये रिकामे करुन देण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती.
 

Web Title: The victims will relocate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक