शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

By admin | Updated: January 7, 2016 23:29 IST

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

अंदरसूल : येवला तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळी तालुका आहे. पालखेड डाव्या कालव्यामुळे काही भाग प्रासंगिक ओलिताखाली येत असला तरी सिंचनासाठी पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमुळे बऱ्याच गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही; मात्र वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील व उत्तर- पूर्व भागातील जवळपास सर्वच गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. अंदरसूल गावात सध्या चार दिवसांनंतर पाणी मिळत आहे. गावाच्या धनगर वस्ती, जयहिंद वाडीवरील वस्टे, औटे, मुंगसे, धनगे वस्ती, खैरनार वस्ती, मन्याड थडीवरील जहागीर वस्ती, सोनवणे वस्ती, गायकवाड वस्ती, ढोले वस्ती, भोसले वस्ती, कोल्हे वस्ती, देवरे वस्ती आदिंसह उत्तरेकडील घोडके, केरे, जाधव, देशमुख आदि सर्व वाड्यावस्त्यांवर पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्याचप्रमाणे उंदीरवाडीचा काही भाग, बोकरे, दुगलगाव, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, आडसरे गाव, खरवंडी, भारम, कोळम, गारखेडे, तळवाडे, पिंपळखुटे, न्याहरखेडे, पांजरवाडी, सायगाव, धामणगाव, नागडे, गवंडगाव रस्ते, सुरेगाव या सर्व गावांत सिंचनासाठी पाणी तर नाहीच; मात्र पिण्यासाठी व जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे तरी ते मिळत नाही. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी धाडस करून लागण केली. त्यात उसनवारी, सोसायटी कर्ज घेऊन पिके घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अपवाद वगळता सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अखेर जनावरांना किमान चारा तरी मिळेल याकरिता ज्वारी पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)मुळातच पशुधन अल्प आहे, त्यांना जगविणेदेखील अवघड झाले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शेतीमाल नसल्याने बळीराजा दैनंदिन अडचणींना सामोरे जाऊन हतबल झाला आहे. येवला तालुक्याच्या बाहेरील कोपरगाव, वैजापूर, नांदगाव या भागातून सर्वाधिक कांदा मार्केटवर येत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती येवला व उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची विक्रमी आवक आहे. त्यामध्ये काही टक्के तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश असला तरी पूर्व भागातील व उत्तर पूर्व भागातील सिंचनासाठी तर नाहीच; मात्र वाड्यावस्त्यांवर शेतकरी व जनावरांना पाण्याची जानेवारी महिन्यातच टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी निव्वळ फार्स न करता सर्वांनी एकत्र येऊन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी निर्णायक भूमिका घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.