तोतया पोलिसांकडून महिलेची फ सवणूक

By Admin | Updated: May 29, 2014 00:30 IST2014-05-29T00:21:15+5:302014-05-29T00:30:30+5:30

नाशिक : रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविल्याची घटना नाशिकरोडला मंगळवारी सकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोडवरील हिमालय सोसायटीत राहणार्‍या सुजाता गौतम कोपीकर या सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या़ त्यांना आम्ही पोलीस आहोत, पुढे चेकिंग सुरू आहे असे सांगून ओळखपत्रही दाखविले़ तसेच सुरक्षिततेसाठी हातातील सोन्याच्या बांगड्या व पोत काढून पिशवीत ठेवण्याचा सल्ला दिला़ या दोघांवर विश्वास बसल्यामुळे कोपीकर यांनी अंगावरील दागिने काढल्यानंतर ते पिशवीत ठेवून देण्याचा बहाणा करून तोतया पोलिसांनी ते लंपास केले़ या प्रकरणी कोपीकर यांनी दिलेल्या फि र्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

The victim's police custody | तोतया पोलिसांकडून महिलेची फ सवणूक

Web Title: The victim's police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.