प्रतिबंधित क्षेत्रातही पुन्हा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:51 IST2020-06-10T22:50:30+5:302020-06-11T00:51:25+5:30
नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या वाढतच असून, बुधवारी (दि. १०) २८ रुग्ण आढळल्याने ही संख्या ५१२ झाली आहे. तर सध्या हॉटस्पॉट असलेल्या नाईकवाडीपुरा भागात तिसरा बळी गेला. बुधवारी या भागात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने शहरातील बळींची संख्या २३ झाली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातही पुन्हा बळी
नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या वाढतच असून, बुधवारी (दि. १०) २८ रुग्ण आढळल्याने ही संख्या ५१२ झाली आहे. तर सध्या हॉटस्पॉट असलेल्या नाईकवाडीपुरा भागात तिसरा बळी गेला. बुधवारी या भागात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने शहरातील बळींची संख्या २३ झाली आहे.
बुधवारी (दि.१०) सायंकाळी शहरात पाच बाधित आढळले. यात एका मृत्यू झालेल्या संशयितालादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईकवाडीपुरा येथील या वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान, पंचवटीतच भद्रकाली फ्रुट मार्केट येथील ६२ वर्षीय वृद्धालादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याशिवाय जुन्या नाशकातच बडी दर्गा परिसरात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय वृद्धेलादेखील संसर्ग झाला आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवर पाटीलनगर परिसरात एका ४३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे सिडकोतील लेखानगर भागात एका ६१ वर्षीय वृद्धाचा आणि नाशिकरोड येथील जयभवानी रोडवरील एका ४१ वर्षीय पुरुषालादेखील कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रात्री सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, त्यात जुन्या नाशकातील अजमेरी चौक भागातील दोन, मुंबई नाक्यावरील भाभानगरातील दोन आणि नाशिकरोड येथील सुभाषरोड आणि शहरातील अशोका मार्ग परिसरात एक बाधित आढळला आहे. तर रात्री उशिरा महानगरात अजून १६ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकुण बाधित संख्या ५१२ वर पोहचली आहे.