शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

जायकवाडीसाठी येवल्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:54 IST

येवला : दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून येवला तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी येवला दुष्काळग्रस्त ...

ठळक मुद्देप्रहार संघटनेचा आरोप : दुष्काळ जाहीर न करण्यामागे षडयंत्र

येवला : दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून येवला तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा जावई शोध सरकारने लावला असून, यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेने केला आहे. येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदार रोहीदास वारुळे यांना निवेदन दिले आहे.येवला तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असून राजापूर, अंदरसूल, नगरसूल या महसूल मंंडलातील संपूर्ण खरीप वाया गेला आहे. कित्येक गावांत पेरण्या झालेल्या नाहीत. जिथे पेरण्या झालेल्या आहेत, तिथे काही उगवलेच नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या सर्वच निकषात पात्र असताना केवळ नागपूरमध्ये बसून काही अधिकाºयांनी व राजकीय लोकांनी येवला तालुक्यात दुष्काळ नसल्याचा अहवाल तयार केला आहे.संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीच्या माहितीवर गावातील दुष्काळी निकष ठरविण्याच्या प्रक्रि येचा तीव्र निषेध केला आहे. महसूल व कृषी विभागाच्या पाहणीवर तसेच गावोगावची स्थानिक पर्जन्यमान स्थिती, साठवण तलावातील पाणी, पाझर तलावातील सध्याचा साठा, भूजल पातळी आदी निकषांवर दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशीही या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, वसंतराव झांबरे, भागीनाथ गायकवाड, भाऊसाहेब कदम, हितेश दाभाडे, किरण दाभाडे, रावसाहेब आहेर, नवनाथ लभडे, भागतवराव सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी