शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर एमसीआयच्या समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 18:03 IST

भारतीय वैद्यक परिषदेने निर्देशित केलेल्या नियामानुसार महाविद्यालयांचे प्रवेश संख्याच्या टप्प्यानुसार आवश्यक मानकांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

नाशिक :  मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिच्या निर्देशांनुसार द्यकीय शिक्षणात व्यापक प्रमाणात संशोधन व्हावे तसेच वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान आणि डॉक्टरांना प्रशिक्षण मिळावे या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयांसाठी किमान मानके निर्धारित करण्यात आली आहेत. यासंदर्भात भारतीय वैद्यक परिषदेने निर्देशित केलेल्या नियामानुसार महाविद्यालयांचे प्रवेश संख्याच्या टप्प्यानुसार आवश्यक मानकांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केलीआहे. या समितीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे डॉ. सुरेशचंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे वरिष्ठ सल्लागार तथा मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. एस. रामजी सह-अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अण्णा बी. पुलीमुड,मनिपाल येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. शरद कुमार राव, मिझोरम येथील झोरम मेडिकल कॉलेज कॉलेजचे सेवानिवृत्त संचालक डॉ. एल. फिलमेट, नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. अचल गुलाटी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, पटना येथील पटना मेडिकल कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजित सिन्हा, उत्तरप्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. रजनीश दुबे, मध्यप्रदेश सरकारचे प्रधान सचिव एस.एस. शुक्ला, जम्मू आणि काश्मिर सरकारचे प्रधान सचिव अतुल दुल्लो, केंद्र सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे माजी संचालक श्री. देवेश देवल आदी समिती  सदस्य आहेत. तसेच समितीचे संयोजक म्हणून बोर्ड ऑफ गव्हन्ससचे जनरल सरचिटणीसडॉ. आर.के. वॅट्स, आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे विधी अधिकारी  शिखर रंजन समितीला सहाय्य करणार आहेत. या समितीव्दारे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या नियामानुसार महाविद्यालयांच्या अस्तित्त्वात असलेल्या किमान मानक  आवश्यकता नियमांचे परीक्षण, वैद्यकीय महाविद्यालयाला दरवर्षी सुमारे 50 ते 250 प्रवेशासाठी आवश्यक असणारी जागा आणि परिसर, प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यता, सध्याच्या शिक्षण व प्रशिक्षण प्रणालीसाठी उपयुक्त व पाठबळ देणारे नवे तंत्रज्ञान, प्रशिक्षण देण्यासाठी उपकरणे, आवश्यक क्लिनिकल साहित्य यांचे परिक्षण करण्यात येणार आहे. याच बरोबर आवश्यक साधनांचा आढावा घेऊन त्यामध्ये काही दुरुस्ती अथवा शिफारस समितीकडून करण्यात येणार आहे. ही समितीव्दारे कोणत्याही प्रासंगिक विषयावर विचार करू शकते तसेच प्रशासकीय बाबींची पहाणी करण्याचे अधिकार या समितीला प्रदान करण्यात आले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठHealthआरोग्यMedicalवैद्यकीय