नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:20 IST2020-07-14T20:01:55+5:302020-07-15T01:20:05+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे गावाला कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नादुरुस्त असलेले जलशुद्धीकरण केंद्रावर ४० लाख रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आले आहे.
परंतु काही दिवसातच तेथील यंत्रणा कुचकामी ठरली असून, पाणी शुद्ध करण्याचेही यंत्र बंद असल्याचे समजते. तर नांदूरशिंगोटे गावात एक कोटी सतरा लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून
नवीन पाइपलाइन करण्यात आली आहे.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना जंतुमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याअगोदर पंधरा दिवसांपूर्वीही गावात जंतुमिश्रित पाणी आल्याच्या तक्रारी होत्या. त्यावेळी सरपंच गोपाल शेळके व उपसरपंच रंजना शेळके तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर पाणीपुरवठा सुरुळीत झाला होता. पुन्हा मंगळवारी सकाळी गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी झाल्याने महिलांनी रोष व्यक्त केला आहे.
---------------------
दुरुस्ती करण्याचे आश्वासन
जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन यंत्रसामग्रीची व पाणीपुरवठ्याची पाहणी केली आहे. तसेच तेथून पुढे गावातील जलकुंभापर्यंत जलवाहिनीची तपासणी करून माहिती घेतली. गावातील नवीन पाइपलाइनमधून जर जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाला असेल तर त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल. दहा दिवसांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. अपवाद वगळता मागील काळातही गावाला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा झालेला आहे. तसेच पुढील काळातही गावात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सरपंच गोपाल शेळके यांनी सांगितले़
गावातील नळांना जंतुमिश्रित पाणी आल्याने ग्रामस्थांनी भ्रमणध्वनी करून व समक्ष पदाधिकाºयांकडे गाºहाणे मांडले आहे. त्यामुळे पाइपलाइन सदोष की जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला, असा प्रश्न् प्रशासनाने पुढे पडला आहे. गावातील सर्वच भागात नळाद्वारे चक्क अळ्या आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.