गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:13 PM2021-04-28T22:13:46+5:302021-04-29T00:44:22+5:30

मांडवड : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शासनाच्या सात ते अकरा या वेळेच्या नियमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वेळ पुरत नसल्याने गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नागरिक पसंती देत आहेत.

Vendors prefer vegetables coming to the village | गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना पसंती

लक्ष्मीनगर येथे भाजीपाला विक्री करतांना संतोष गांगुर्डे.

Next
ठळक मुद्देगावातील नागरिकांची गैरसोय दूर झाली

मांडवड : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शासनाच्या सात ते अकरा या वेळेच्या नियमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वेळ पुरत नसल्याने गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नागरिक पसंती देत आहेत.

गावातील लक्ष्मीनगर येथील तरुण संतोष गांगुर्डे याने गावात भाजीपाला विक्री सुरू केली आहे. पूर्वी संतोष आपल्या गाडीत मालवाहतूक व शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने संतोषची गाडी अक्षरशः उभीच राहिली होती. मात्र, गावात नागरिकांना भाजीपाला मिळत नसल्याचे संतोषच्या लक्षात आले. त्यानंतर संतोषने नांदगाव बाजार समितीच्या बाजारातून विविध प्रकारचा भाजीपाला भरला व तो गावात विकण्यास सुरुवात केली. यातून त्याला व त्याच्या गाडीला काम मिळाले व गावातील नागरिकांची गैरसोय दूर झाली .

Web Title: Vendors prefer vegetables coming to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.