पिंपळगाव बसवंत : गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुरत - शिर्डी महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून, गटाराचे व साइटपट्टीचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे याचा फटका एका वाहनचालकाला बसला. याबाबत वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे व लवकरात लवकर या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.पिंपळगाव बसवंत शहर हे व्यापारी व मोठी बाजारपेठ असलेले गाव असून, शहरात वाहनांची रहदारी जास्त प्रमाणात आहे. दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यातच शहरातून जाणाऱ्या शिर्डी सुरत महामार्गाचे कामदेखील सुरू असल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण होत आहे.त्यामुळे वाहनचालकांचे वाद व छोटे-मोठे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून होणाºया अपघातांना आळा घालावा, अशी मागणी वाहनधारकांकडूून होत आहे.
साइटपट्ट्या नसल्याने वाहन थेट नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:33 IST