जेलरोड येथे वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:13+5:302021-07-05T04:10:13+5:30

जेलरोड मोरे मळा, बालाजीनगर येथील सलमा नूर मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ...

Vehicle vandalism at Jail Road | जेलरोड येथे वाहनांची तोडफोड

जेलरोड येथे वाहनांची तोडफोड

जेलरोड मोरे मळा, बालाजीनगर येथील सलमा नूर मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गणेश यादव हा सिगारेट मागण्यासाठी आला. सलमा खान यांनी ही सिगारेट घेण्याची वेळ आहे का असे म्हटल्याने डोक्यात कोयत्या टाकेन असा दम देत गणेश निघून गेला. नंतर थोड्या वेळाने गणेश यादव, साहिल उर्फ पोशा व त्यांचे दोन मित्र हे हातात कोयते, हॉकी स्टीक घेऊन सलमा खान यांच्या घराजवळ येऊन शिवीगाळ केली. तसेच परिसरातील चार रिक्षा (एमएच१५ एसयू ४८४६, एमएच १५ एके६३९४, एमएच झेड ०५२८, एमएच १५ एसयू ११६२) एक स्वीफ्ट कार (एमएच ०२ बीडी ०५९३) यांच्या काचा फोडून नुकसान केले. परिसरातील घरांवर दगडफेक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Vehicle vandalism at Jail Road