घराच्या पार्किंगमधून वाहनाची चोरी

By Admin | Updated: July 14, 2017 17:37 IST2017-07-14T17:37:59+5:302017-07-14T17:37:59+5:30

सातपूर परिसरातील जाधव संकुल भागात निकिता हाईट्स या रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी वाहन चोरून नेल्याचा प्रकार घडला

Vehicle Theft in the house parking | घराच्या पार्किंगमधून वाहनाची चोरी

घराच्या पार्किंगमधून वाहनाची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सातपूर परिसरातील जाधव संकुल भागात निकिता हाईट्स या रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी वाहन चोरून नेल्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अंबड-सातपूर लिंकरोड भागातील दत्तमंदिरच्या मागील जाधव संकुलमधील निकिता हाईट्स इमारतीतील रहिवासी राजू कृष्ण बिराडे यांची दुचाकी (पल्सर) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी बिराडे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Vehicle Theft in the house parking