इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी व बाहेर फिरताना माक्स न वापरणारे, विनाकारण रस्त्यावर वाहने फिरविणे, अशा तीस जणांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन असून आत्तापर्यंत दुचाकी वाहनावर डबलसीट, चारचाकी वाहनात तीनपेक्षा जास्त, वेळेचे बंधन न पाळता दुकान उघडे ठेवणारे व्यावसायिकांवर सुमारे साडेपाचशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच सुमारे साडेतीनशे वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधक पथक, बीट मार्शल आणि संबंधित पोलीस चौकीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
इंदिरानगरात वाहने जप्तीची मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:31 IST