शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

भाजीमंडईची दुरवस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 9:59 PM

अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : बेघरांकडून भाजीमंडईचा ताबा

पंचवटी : अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे दाखल झाले होते. कालांतराने मुंढे यांची बदली झाली त्यांच्या जागी महापालिका आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे आले मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या भाजीमंडईकडे दुर्लक्ष केल्याने सध्या अनेक बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी महापालिकेत दाखल झालेल्या मुंढे यांनी सदर भाजीमंडई स्वच्छ करण्याबाबत प्रशासनाला सूचना करून भाजीविक्रेत्यांना भाजीमंडईत स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.मुंढे शिस्तप्रिय असल्याने भाजीविक्रेते भाजीमंडईत दाखल होतील अशी शक्यता वर्तविली जात होती, मात्र लोकप्रतिनिधी व मुंढे यांच्यात खटके उडाल्याने पालिका आयुक्त विरु द्ध लोकप्रतिनिधी अशी संपली होती. अनेक कारणांवरून वादात सापडलेल्या मुंढे यांची अखेर बदली झाली. त्यानंतर गमे यांनी पदभार स्वीकारला त्यामुळे भाजीमंडई विक्रेत्यांसाठी खुली होईल अशी शक्यता होती, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने कोट्यवधी रुपयांची भाजीमंडई धूळ खात पडून आहे. त्यामुळे अनेक बेघर नागरिकांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजीबाजार भरण्याऐवजी अतिक्रमण झाल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. तसेच भिकारी आणि बेघरांनी ताबा घेतल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी आणि जुगारींचा अड्डा या ठिकाणी जमतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कारवाई मागणी केली आहे.इमारत पडली ओसगंगाघाटावरील भाजीविक्रे त्यांना भाजीपाला विक्र ीसाठी गणेशवाडी आयुर्वेद रु ग्णालयासमोर महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रु पयांचा खर्च करून भाजीमंडई इमारत उभारली होती. मात्र अगदी सुरु वातीपासूनच वादात सापडलेल्या भाजीमंडईतविक्रे त्यांनी स्थलांतर होण्यास नकार दिल्याने भाजीमंडई इमारत आजही ओस पडून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे