भाजीपाल्याचे दर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:02+5:302021-05-30T04:13:02+5:30
नाशिक : पावसाळ्यापूर्वी विविध मार्गांवर असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात अनेक ...

भाजीपाल्याचे दर उतरले
नाशिक : पावसाळ्यापूर्वी विविध मार्गांवर असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात अनेक झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात, यामुळे नुकसान होते. पावसाळ्यापूर्वी या झाडांची छाटणी करणे आवश्यक असल्याने, या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
कारागिरांना मदत करण्याची मागणी
नाशिक : लॉकडाऊनमुळे वाहन दुरुस्तीची गॅरेज बंद असल्यामुळे येथील कारागिरांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीचे काही दिवस मालकांनी त्यांना पगार दिला, पण त्यांनाही आता ते शक्य होत नसल्याने, या कारागिरांना अर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
परप्रांतीय कारागिरांमुळे कामे रखडली
नाशिक : लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कारागीर आपापल्या गावी गेल्यामुळे अनेक बांधकामांवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काहींनी बांधकाम करण्याचा निर्णय काहीकाळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी स्थानिक मजुरांमार्फत कामे केली जात आहेत.
बंदमुळे हॉटेलकडून मागणी घटली
नाशिक : शहरातील अनेक हॉटेल्स बंद असल्यामुळ हॉटेलांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. जे हॉटेल पार्सल सेवा पुरवित आहेत, त्यांना मागणी कमी असल्यामुळे त्यांच्याकडून भाजीपाला मर्यादित स्वरूपात खरेदी केला जात असल्याने, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
द्वारका चौकात पुन्हा वाहतूककोंडी
नाशिक : उड्डाणपूल जोडणीच्या कामामुळे उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने द्वारका चौकात पुन्हा अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून, वाहतूककोंडी होऊ लागली आहे. उड्डाणपूल जोडणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.