शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांची आवक ४० टक्क्यांनी घटली

By admin | Updated: June 24, 2014 00:27 IST

सायगाव : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन ३०० डॉलर केल्यामुळे येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकमध्ये कमालीची घट झाली आहे.

सायगाव : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन ३०० डॉलर केल्यामुळे येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकमध्ये कमालीची घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक पर्यायाने पुरवठा कमी होत असल्याने बाजारभावात सुधारणा झाल्याचे दिसून आले. कांद्यास उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, आसाम आदि राज्यांत मागणी चांगली आहे. सप्ताहात एकूण कांदा आवक ६५६१ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १७०० रुपये, तर सरासरी १२०० रुपयांपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ७७५५ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान ३०० रुपये ते कमाल १६५२ होते, तर सरासरी १२०० रुपयांपर्यंत राहिले.केंद्र सरकारने पाऊस लांबल्याने भविष्यात देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव वाढून शहरी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटनाला ३०० डॉलरने वाढविल्याने जागतिक बाजारात कांद्याला चांगले बाजारभाव असूनही शेतकऱ्यांचा कांदा कमीदराने विक्री केला जाणार आहे. शासनाची ही नीती शेतकरी विरोधात असून, येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण देवरे, शेतकरी नेते- संतु पाटील झांबरे, भाजपाचे - भाऊ लहरे, जनता दलाचे - दिनकर लोहकरे, रिपाइंचे - संजय पगारे आदिंनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे. शासनाने शेतकऱ्यांना पैसा मिळू द्यावा. निर्यातमूल्य शून्यावर आणावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)